अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे, नितेश राणेंचा राऊतांवर प्रहार

आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे.

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 13:58 PM, 3 Nov 2020
अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे, नितेश राणेंचा राऊतांवर प्रहार
Nitesh Rane

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत ट्रोल झाले आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केला होता. मात्र अचानक खासदार राऊत यांना शिंका आली आणि त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून आपला हात नाकावर धरून शिंकले. त्यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे. (Nitesh Rane On Vinayak Raut)

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून तोंडावर मास्क घालतात. मात्र शिंकताना खासदार राऊत नेमकं हेच विसरले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनीदेखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार. एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे?, अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे”, अशा शब्दांत आमदार नितेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे.

तत्पूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली होती. “पेंग्विन आणि कंगना रनौतच्या प्रकरणातील वकिलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला होता.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

“नितेश राणेंना खासगीत विचारा…” कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, म्हणजेच दाल में कुछ काला है!; नितेश राणेंचा दावा