मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, म्हणजेच दाल में कुछ काला है!; नितेश राणेंचा दावा

सुशांतसिंह राजपूत असो की दिशा सालियनप्रकरण असो, त्याबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देऊन त्यांचे चिरंजीव, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा बचाव केला. याचाच अर्थ दाल में कुछ काला है, असा दावा करतानाच या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास झालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजप नेते नितेश आमदार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, म्हणजेच दाल में कुछ काला है!; नितेश राणेंचा दावा

मुंबई: सुशांतसिंह राजपूत असो की दिशा सालियनप्रकरण असो, त्याबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देऊन त्यांचे चिरंजीव, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा बचाव केला. याचाच अर्थ दाल में कुछ काला है, असा दावा करतानाच या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास झालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी केली आहे. (bjp mla nitesh rane slams cm uddhav thackeray)

आमदार नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी खास संवाद साधताना हा दावा केला. खरे तर सुशांतसिंह राजपूतप्रकरण असो की दिशा सालियनप्रकरण असो. आम्ही कुणीही आदित्य ठाकरेंचं नावा घेतलं नव्हतं. त्यावर आदित्य ठाकरेंनी स्वत: पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं. आता त्यांच्या वडिलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. याचाच अर्थ दाल में कुछ काला है हे स्पष्ट होतं, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला क्लीन चीट देत बसू नये. तुमचा मुलगा श्रावण बाळ आहे म्हणूच तो दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशी पूजा करायला जातो का? तो दूधाने धुतलेला नाही, असा चिमटा काढतानाच महाराष्ट्राची बदनामी आम्ही केलेली नाही. विरोधी पक्षानेही केलेली नाही. महाराष्ट्राची बदनामी कुणी केली असेल तर या श्रावण बाळानेच केली आहे. त्याच्या रात्रीच्या धंद्यांवर कंट्रोल ठेवला असता तर आज हे घडलंच नसतं. सुशांतसिंह-दिशा सालियनचा जीव गेलाच नसता… कंगना रनौतचं ऑफिस तोडायला लागलं नसतं. , असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

सुशांतसिंहप्रकरण आणि दिशा सालियनप्रकरण सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. बिहारच्या महाधिवक्त्याने कोर्टात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे. असं असताना मुख्यमंत्री मुलाला क्लीन चिट देत आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे, असंही ते म्हणाले. एवढीच खुमखुमी असेल तर दिशा सालियन प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करा. पोलिसांना खुला तपास करू द्या. 8 तारखेला काय झालं? तिथे कोण होतं? मोबाइल टॉवरचं लोकेशन काय होतं? सर्वांना कळू द्या. हे सगळं बाहेर आले तर क्लीन चिट सोडा, कोणाकोणाला जेलची हवा खावी लागेल ना त्याच्या ब्रेकिंग बातम्या बनतील, असा दावाही त्यांनी केला. (bjp mla nitesh rane slams cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

वाया गेलेल्या मुलाच्या फ्रस्टेड बापाचं भाषण, श्रावणबाळ आदित्य दिनोच्या घरी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार?

महाआघाडीचं सरकार लवकरच पडणार हे शरद पवारही जाणून: निलेश राणे

(bjp mla nitesh rane slams cm uddhav thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *