BJP: आता वेट अँड वॉच नाही, भाजपची स्ट्रॅटेजी ठरली! शनिवारी किंवा रविवारी भाजप सरकार, वाचा इनसाईड स्टोरी

एकनाथ शिंदे गट महराष्ट्रात आलाच नाही तर भाजपने दुसरा प्लॅनही तयार ठेवला आहे. राज्यातील अस्थिर स्थिती पाहता, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावतील.

BJP: आता वेट अँड वॉच नाही, भाजपची स्ट्रॅटेजी ठरली! शनिवारी किंवा रविवारी भाजप सरकार, वाचा इनसाईड स्टोरी
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Jun 28, 2022 | 11:05 AM

मुंबईः आमच्याकडे शिवसेनेचे (Shivsena) 40 आणि अपक्ष अशा एकूण 50 पेक्षा जास्त आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचं पुढचं पाऊल काय असेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सर्व सत्तानाट्यात आतापर्यंत प्रत्यक्ष कुठेही नसलेला भाजप (BJP) आता जाहीर रित्या पुढे येण्याच्या स्थितीत आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतरही शिंदे गटाची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असं म्हणणाऱ्या भाजपने पडद्यामागे मात्र मोठी रणनीती आखण्याची तयारी सुरु केली होती. आता भाजपच्या गोटातील प्लॅन पूर्णपणे तयार झाला असून येत्या शनिवारी किंवा रविवारी भाजप सत्तास्थापनेच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. टाइम्स ऑफ इंडियात दिलेल्या वृत्तानुसार, भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानं या वृत्ताला दुजोरा दिलाय.

एकनाथ शिंदेंची पुढील रणनीती काय?

भाजपमधील वरिष्ठ नेत्याने केलेल्या सूतोवाचानुसार घडलं तर पुढील एक ते दोन दिवसात एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात येतील. इथे आल्यावर ते राज्यपालांसमोर ते महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भातील पत्र राज्यपालांना देतील. तसेच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने अविश्वास दर्शक ठरावाला त्यांनी सामोरं जावं अशी विनंती करतील.

भाजपचा महत्त्वाचा प्लॅन काय?

एकनाथ शिंदे गट महराष्ट्रात आलाच नाही तर भाजपने दुसरा प्लॅनही तयार ठेवला आहे. राज्यातील अस्थिर स्थिती पाहता, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनात भाजप फ्लोअर टेस्टसाठी विनंती करेल. मात्र या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार गैरहजर राहतील, याची काळजीही भाजपकडून घेतली जाईल. 50 पेक्षा जास्त आमदार फ्लोअर टेस्टला गैरहजर राहिले तरीही महाविकास आघाडी सरकार कोसळेल. भाजपच्या प्लॅन प्रमाणे सगळं काही घडलं तर शनिवार किंवा रविवारपर्यंत राज्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केला आहे. दोन्ही प्लॅन तयार आहेत. दोन्हीमध्येही फ्लोअर टेस्ट ही घेतलीच जाणार आहे. यंदा मात्र भाजप पुरेशा संख्याबळाने पुढे येणार असून अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या फडणवीस आणि अजित पवारांच्या युतीसारखी चूक यावेळी होणार नाही, याची खबरदारी भाजपतर्फे घेतली जात आहे, असेही भाजपमधील सूत्रांनी सांगितलं.

आता फक्त पक्षश्रेष्ठींच्या इशाऱ्याची प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कोअर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. आता मात्र भाजपचा प्लॅन ठरला असून फक्त उच्चस्तरीय नेत्यांनी ‘मूव्ह ऑन’ म्हणण्याची वाट पाहिली जात आहे. तसं तर सुप्रीम कोर्टानं सोमवारी एकनाथ शिंदे गटाकडून कौल दिल्यानंतरच भाजपच्या प्लॅननुसार हालचालींनी वेग पकडलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेते आता कधीही अॅक्शन मोडवर जाऊ शकतात.

शिंदे गट भाजपात विलीन होणार?

एकनाथ शिंदे गट भाजप किंवा मनसेत विलीन होण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर उत्तर देताना भाजपचे वरिष्ठ नेते म्हणाले, एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे ते भाजपा किंवा मनसेत शामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें