… म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोस्टरवर धनुष्य नाही, तर कमळ

... म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोस्टरवर धनुष्य नाही, तर कमळ


वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वर्ध्यात घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर कमळ चिन्ह असल्याने गदारोळ झाला. यावर भाजपच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये, म्हणूनच तसे केल्याचे कारण भाजपने दिले. सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विदर्भातील शिवसेनेचे उमेदवारही मंचावर होते. मात्र, पोस्टरवरून धनुष्यबाण गायब असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता.

भाजप शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. उमेदवारांच्या प्रचारात संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून फलकांवर कमळाचे चिन्ह लावल्याची माहिती भाजपचे स्थानिक नेते रामदास तडस यांनी दिली. शिवसेनेच्या संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनीही याच्याशी सहमती दर्शवली. युती झाली आहे, नेत्यांचे फोटोही असून वर्ध्यात उमेदवार भाजपचा असल्याने संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून कमळाचे चिन्ह लावल्याचे गुढे यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप युतीनंतरही राज्यात काही ठिकाणी युतीमध्ये संघर्षाची चिन्हे वारंवार दिसत आहेत. यामागे कधी पोस्टरचे निमित्त आहे, तर कधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या शेरेबाजीचे. शिवसेनेने ईशान्य मुंबईत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीलाही विरोध केला आहे. तेथेही युतीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे.

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI