गिरीश महाजन यांचं ‘ते’ वक्तव्य, शिंदे गटाच्या आमदाराने खोडून काढलं, म्हणाले क्रेडिट घेऊ नका….

गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे...

गिरीश महाजन यांचं 'ते' वक्तव्य, शिंदे गटाच्या आमदाराने खोडून काढलं, म्हणाले क्रेडिट घेऊ नका....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 4:31 PM

बुलढाणाः शिवसेना (Shivsena) फोडण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? पक्ष प्रमुखांचं दुर्लक्ष भोवलं की अंतर्गत बंडाळी वाढली? ठाकरेंभोवतीची (Uddhav Thackeray) चौकडी यासाठी कारण ठरली का सर्वत्र चर्चेत असलेल्या त्या महाशक्तीचा यामागे हात आहे? शिवसेनेच्या फुटीमागे नेमकं कोण आहे, याची आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. आम्ही बंडखोरी का केली, याचं शिंदे गटाकडून वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलंय… तर जळगाव भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आम्हीच शिवसेना फोडली, यावरून आता श्रेयवाद रंगतो की काय, अशी चिन्ह आहेत.

शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. भाजप नेत्याने प्रथमच अशा प्रकारे उघड भाष्य केलं. पण शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाजनांचं हे वक्तव्य खोडून काढलं.

संजय गायकवाड म्हणाले, ‘ गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही.. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती.. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो..

राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे…

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

शिवसेना फोडणे हे भाजपचं मिशन होतं, अशी कबूली भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, आधी आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ सैन्य बाहेर पडले.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.