…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल, प्रकाश आंबेडकरांचा सल्लावजा इशारा

आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, उपयोग झाला नाही. (Prakash Ambedkar Presidential Rule)

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 18:01 PM, 24 Nov 2020

सांगलीः राज्य सरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे, राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बंडखोरी आहे, ते घटनाबाह्य आहे, त्यामुळे केंद्र सरकार कदाचित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकते, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला सल्लावजा इशारा दिला आहे. सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Central Government Will Impose Presidential Rule In Maharashtra, Prakash Ambedkar Warning Thackeray Government)

फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, त्यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली नाही, आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या, तरी त्यांनी त्या दिल्या नव्हत्या. शिवाय काँग्रेस हा पक्ष संपला आहे, आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही. ऐन निवडणुकीत हॉलिडे मूडमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीचं कल्याणच होणार, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर केली. Central Government Will Impose Presidential Rule In Maharashtra, Prakash Ambedkar Warning Thackeray Government

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ‘वंचित’ने त्यांच्याशी युती केली नाही. आम्ही केवळ हरलेल्या जागा मागितल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हवापालटासाठी सोनिया आणि राहुल गांधी गोव्यात

दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. राहुल गांधीही त्यांच्यासोबत गोव्यात आले आहेत. साधारण एक आठवडा मायलेक गोव्यात राहतील, असे सांगितले जात आहे.

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षातही सध्या विरोधाचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसकडून काही पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता सोनिया गांधी आणि राहुल गांधीच दिल्लीत नसल्याने ही प्रक्रिया लांबवणीवर पडली आहे.

Central Government Will Impose Presidential Rule In Maharashtra, Prakash Ambedkar Warning Thackeray Government

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

दिल्लीची हवा बिघडली; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात

उद्धव ठाकरेंनी सांगावं, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल