लोकशाहीत सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत; चंद्रकांत पाटलांचं आव्हान

लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, शिवसेनेने ते खोडावेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 15:25 PM, 13 Nov 2020
Pune MLC election Maharashtra 2020 results NCP Arun lad ahead of bjp Sangram deshmukh

सातारा : “लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार आहेत, शिवसेनेने ते खोडावेत”, असं आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलं आहे. साताऱ्यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. (Chandrakant Patil Criticize On Uddhav Thackeray anvay naik matter)

भाजपचे नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण जाणीवपूर्वक समोर ठेवून अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत का?, असा प्रश्न भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला होता. त्याला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी कराराचे पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी कोर्टात जावे, असे पाटील म्हणाले. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते खोडावेत, असंही चंद्रकांत पाटील शिवसेनेला उद्देशून म्हणाले आहेत.

या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?, असा सवाल करत आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही. मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात.. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली, यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो.

गेल्या 11 महिन्यांपासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे हे सर्वसामान्यजनता पाहत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये राहुल गांधींचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा केला आहे, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, या विषयी मला माहीत नाही. पण असला प्रश्न संजय राऊत यांना विचारा, अस टोला पाटील यांनी लगावलाय.

ओबामा काय म्हणतात?

राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे, पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) या पुस्तकात मांडले आहे.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

(Chandrakant Patil Criticize On Uddhav Thackeray anvay naik matter)