अहंकाराने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द : चंद्रकांत पाटील

या सोडतीसाठी मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी नियोजित होतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:59 PM, 11 Jan 2021
chandrakant patil

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. अहंकाराने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द केली गेल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलाय. त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलंय. त्या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. (chandrakant patil criticize on ajit pawar Prime Minister Housing Scheme)

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पातील सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम आज ठरविण्यात आला होता. या सोडतीसाठी मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी नियोजित होतो. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात रितसर निमंत्रण ही देण्यात आले होते. मात्र अहंकाराने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांनी या कामाचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी देऊन हा कार्यक्रम रद्द केल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी देऊन हा कार्यक्रम रद्द करायला लावल्याची निंदनीय घटना आज घडली. चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत येथील सोडतीचा कार्यक्रम आज ठरला होता आणि 5/6 हजार गोरगरीब आपल्या स्वतःच्या मालकी हक्काचे घराचे स्वप्न साकार होईल, यासाठी मोठ्या आशेने जमले होते. मात्र अहंगंडाने पछाडलेल्या सरकारने मुख्य सचिवांमार्फत मनपा आयुक्तांवर दबाव आणून ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

शासनाचे हे कृत्य निषेधार्ह आहेच, पण त्याचबरोबर गोरगरिबांप्रति हे सरकार असंवेदनशील असल्याचे ही निदर्शक आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक ही हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी दमदाटी करत होते. मात्र पिंपरी चिंचवडची जनता सूज्ञ असून भाजपने केलेली विकासकामे यामुळे जनता भाजपच्याच पाठीशी आहे. श्रेयवादासाठी तडफडणारी राष्ट्रवादी अश्लाघ्य पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून निरंकुश आणि सत्तांध असल्याचे दाखवून देत आहे, या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

संबंधित बातम्या

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला, चंद्रकांत पाटलांची उपरोधिक टीका

केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

chandrakant patil criticize on ajit pawar Prime Minister Housing Scheme