म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसं सांगितलं असावं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सांगली : मला जर विचारालं तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसं सांगितलं असावं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली. (Chandrakant Patil On Uddhav Thackeray Government)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्याबाबत पाटील यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.
सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे सरकार फार कुंथत कुंथत चाललं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, असा सवाल त्यांना केला असता राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात. त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे, असं म्हणत पाटील मिश्किल हासले. उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रश्नांबाबत मी अनेकदा पत्रं लिहिली. पण त्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
LIVETV | शरद पवार बाहेर पडतात, पण उद्धव ठाकरे काही बाहेर पडत नाहीत, सांगलीतून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह https://t.co/atVRNYeisi @ChDadaPatil @BJP4Maharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @PawarSpeaks pic.twitter.com/2D6F5zjibX
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2020
संबंधित बातम्या:
शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात? मिटकरींनी डिवचले