आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

मुंबई : “सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा (Chandrakant Patil on Maharashtra Floor Test ) आम्ही आदर करतो. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून बहुमत सिद्ध करणारच असा विश्वास व्यक्त केला. (Chandrakant Patil on Maharashtra Floor Test )

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. कोर्टाने उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस सरकारला दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही, त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

भाजपचं संख्याबळ किती?

विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागी विजय मिळवला. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत 145 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपला 6 अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या 7 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 118 वर गेलं आहे.

अजित पवारांचा पाठिंबा

अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे आम्ही 170 पर्यंत पोहोचू असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार-

 1. महेश बालदी – उरण (रायगड)
 2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
 3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
 4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
 5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
 6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
 7. प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)
 8. संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)
 9. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
 10. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
 11. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

भाजप संख्याबळ – 105 +11 + अजित पवार (3) = 119

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

 1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
 2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
 3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
 4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
 5. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
 6. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
 7. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
 8. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

शिवसेना संख्याबळ 56 + 8 = 64

राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ – 54

काँग्रेस – 44

शिवसेना 64 + राष्ट्रवादी 54+काँग्रेस 44 = 162

आम्ही 162 – महाविकासआघाडीचा दावा

दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीने आपल्याकडे 162 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. तसं पत्र महाविकासआघाडीने राज्यपालांना दिलं आहे. सर्व आमदारांच्या त्यावर सह्या आहेत.

यांचा पाठिंबा कोणाला?

 • मनसे – 01
 • माकप – 01
 • एमआयएम – 02

कोणालाही बहुमत नाही

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

आताचं संख्याबळ

महाराष्ट्र विकास आघाडी

• शिवसेना 56
• शिवसेना समर्थक 07
• राष्ट्रवादी 51
• काँग्रेस 44
• स्वाभिमानी 01
• मार्क्सवादी 01
• सपा 02
• एकूण 162

भाजप युती
• भाजप 105
• भाजप समर्थक 011
• अजित पवार समर्थक – 003
• एकूण 119

कुंपणावर
• एमआयएम 2
• एमएनएस 1
• बविआ 3
• अपक्ष 1
• एकूण 7

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

 • भाजप – 105
 • शिवसेना – 56
 • राष्ट्रवादी – 54
 • काँग्रेस – 44
 • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
 • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
 • एमआयएम – 02
 • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
 • मनसे – 01
 • माकप – 01
 • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
 • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
 • अपक्ष – 13
 • एकूण – 288

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI