Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार, सुप्रिया सुळेंबाबत केललं वक्तव्य भोवणार?

यावरून दिवसभर राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलनं केली आहे. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. आणि आता तर हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे पोहोचले आहे.

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार, सुप्रिया सुळेंबाबत केललं वक्तव्य भोवणार?
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 7:40 PM

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे बोलणं आता चंद्रकांत पाटलांना भोवणार का? असा सवाल या तक्रारीने उपस्थित झाला आहे. यावरून दिवसभर राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलनं केली आहे. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. आणि आता तर हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे (State Women Commisssion) पोहोचले आहे. त्यामुळे पाटलांविरोधात आता महिला आयोगही कठोर आदेश देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पुण्यातही पडसाद उमटले आहेत. पुण्यात बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. पुण्यात पाषाण सुस रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लावले हे बॅनर झळकले. एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

राज्यभर आंदोलनं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व महिलांबाबत वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रास्ता रोको करत चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आली. भाजपच्या मोठ्या पदावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे व महिलांबाबत असे वक्तव्य करणे हे त्यांच्या पदाला अशोभनीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याचा निषेध करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

फौजिया खानही रस्त्यावर उतरल्या

चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून परभणीत राष्ट्रवादी आक्रमक झाली असून , राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष, फौजिया खान यांच्या नेतृत्वात परभणीत राष्ट्रवादीकडून आज जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटलांची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी प्रतिकात्मक प्रेत जप्त केलं . यावेळी आंदोलकांकडून चंद्रकांत पाटील विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . येणाऱ्या दिवसात चंद्रकांत पाटलांनाच जनता घरी बसावेल अशी टीका ही यावेळी करण्यात आली .
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.