राणे म्हणाले, तर शिंदेंना भाजपात घेऊ, शेलारांनंतर आता चंद्रकांत पाटील म्हणतात, रिमोट कंट्रोल दुसरीकडेच!

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं म्हटलं आहे. राणेंच्या या विधानानंतर राजकीय पतंगबाजी सुरू झाली आहे. (chandrakant patil)

राणे म्हणाले, तर शिंदेंना भाजपात घेऊ, शेलारांनंतर आता चंद्रकांत पाटील म्हणतात, रिमोट कंट्रोल दुसरीकडेच!
chandrakant patil
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 4:07 PM

मुंबई: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं म्हटलं आहे. राणेंच्या या विधानानंतर राजकीय पतंगबाजी सुरू झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही राणेंच्या विधानाला हवा दिली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. त्यांना लाल दिवा आणि कॅबिनेटचा स्टाफ मिळतो. पण रिमोट कंट्रोल दुसरीकडेच आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. (chandrakant patil reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, कॅबिन स्टाफ मिळतो पण या मंत्रीमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

राजकीय भेट नव्हती

यावेळी त्यांनी राणे-हितेंद्र ठाकूर भेटीवरही भाष्य केलं. वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांची भेट राजकीय नव्हती. राणेंसारखा एवढा मोठा नेता कोणाला भेटतो तर त्यांनी याचा अर्थ असा काढू नये. भाजपच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे, असे पाटील म्हणाले.

स्वबळावरच लढणार

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार किती वेळ चालेल माहीत नाही. पण भाजपसोबत आलेल्या या सरकारमुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही नक्की न्यात देऊ. पुढील निवडणुका या स्वबळावरच लढवू, असं सांगतानाच शिवसेना आमच्या सोबत येईल हा जर तरचा प्रश्न आहे. पण आम्ही स्वतंत्रच लढणार ही भूमिका कायम आहे, असं ते म्हणाले.

मग आंदोलन भाजप पुरस्कृत कसे?

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजी राजे सरकारची भूमिका समजून घेतात असं सत्ताधारी म्हणतातय. मग नांदेडचे आंदोलनभाजप पुरस्कृत होते असे कसे म्हणता? असा सवाल त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना केला.मागास आयोगाचे काम सरकार सुरू का करत नाही? अशावेळी आंदोलन करू नका असे सरकार कसे म्हणू शकते?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

दानवेंना अनादर करायचा नव्हता

यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रतिक्रियेवर सारवासारव केली. रावसाहेब दानवे हे ग्रामीण भागातील नेते आहेत. त्यांची ग्रामीण बोली भाषा आहे. मोदींबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ हा अनादर करणे असा होत नाही, असा दावा त्यांनी केला.

महापौर टीका कशा करू शकतात?

मी भांडूपमधून येत असताना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यक्रमाला फटाके वाजविण्यासाठी किती गर्दी होती. अशावेळी महापौर जन आशीर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?, असा सवाल त्यांनी केला. पेडणेकर यांनी जन आशीर्वाद यात्रा ही जन छळवणूक यात्रा असल्याचं विधान केलं होतं.

सर्वच मंत्र्यांची गळचेपी

यावेळी त्यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणेच अन्य मंत्र्यांचीही स्थिती हीच आहे. सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत आहे, असा दावाही त्यांना केला. (chandrakant patil reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; ‘तो’ किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक

आधी राणेंनी खडा टाकला, आता शेलारांनी शिंदेंच्या ‘त्या’ गोष्टीवर बोट ठेवलं, वाचा नेमकं काय घडतंय?

यशोमती ठाकूरांचा अजितदादांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंनी दिलं थेट उत्तर

(chandrakant patil reaction on narayan rane’s comment over eknath shinde)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.