मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्षबिक्ष येऊच शकत नाही : पंकजा मुंडे

पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.

मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्षबिक्ष येऊच शकत नाही : पंकजा मुंडे

नांदेड : शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. (pankaja munde on farmer help)

आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारने उशीर करू नये. प्रत्येक पिकाबाबतचे ठोकताळे ठरवून शेतकऱ्यांना आताच मदत देणे गरजेचे असल्याचं मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं आहे.

लोहा तालुक्यातील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबरडा फोडला. आमचं सगळं गेलं आम्ही कसं जगायचं, असा सवाल या शेतकऱ्यानं विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याचं सांत्वन केलं. दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून या शेतकऱ्याला रडू कोसळलं. ताई इकडं या माझ्या शेतात बघा आम्ही कसं जगायचं. मूग गेला, सोयाबीन गेला, कापूस गेला आमचं सगळंच गेलं.

आम्ही कसं जगायचं असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण देखील शेतकऱ्यांनी काढली. दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. उसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता, पण कामगारांच्या प्रश्नात बऱ्याच ठिकाणी राजकारण चालतं. मुंडे साहेबांच्या काळात ऊसतोड कामगार आणि कारखानदार लवाद जेव्हा बसतो तेव्हा दोन बैठकीत निर्णय व्हायचा. तीच परंपरा आम्ही चालू ठेवली आहे. साखर कारखानदार, साखर संघ आणि नेत्यांना माझं आपण आवाहन केलं. दसऱ्यापर्यंत ऊसतोड कामगाराचा प्रश्न सोडवा अन्यथा दुर्गा आष्टमीच्या दिवशी ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य

जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची; पंकजा मुंडेंकडून फडणवीसांची पाठराखण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *