VIDEO: उद्धव ठाकरेंकडून देशाचा अपमान, लवकरात लवकर माफी मागा: नितेश राणे

देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाचा अपमान केला आहे. (nitesh rane)

VIDEO: उद्धव ठाकरेंकडून देशाचा अपमान, लवकरात लवकर माफी मागा: नितेश राणे
nitesh rane


चिपळूण: देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाचा अपमान केला आहे. त्यांनीच लवकरात लवकर देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. (CM Uddhav Thackeray must apologise to country, says nitesh rane)

नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. नाराणय राणेसाहेब रत्नागिरीतील यात्रा सुरु करत आहेत. हे सरकार देशद्रोही आहे का? देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणार का? देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाची माफी मागावी. नंतर पुढचं पुढे पाहू, असं नितेश राणे म्हणाले.

हे सरकार देशविरोधी

हे सरकार आधी हिंदू विरोधी आहे हे ऐकलं होतं, आता देशविरोधी हे सरकार आहे का? उद्या देशाच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही अटक करणार का? राणेसाहेबांनी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया दिली. हे सरकार देशद्रोही सरकार आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

राणे नेमंक काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. (CM Uddhav Thackeray must apologise to country, says nitesh rane)

संबंधित बातम्या:

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

शिवसेना-भाजपच्या राड्यात, राष्ट्रवादीची उडी; नवाब मलिक म्हणाले, हा तर महाराष्ट्राचाच अपमान

(CM Uddhav Thackeray must apologise to country, says nitesh rane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI