भाजपचा झेंडा घेऊन फिरल्यास घरात घुसून मारु, नागपूरच्या काँग्रेस आमदाराची धमकी

विधानसभा निवडणूक (Assembly Election) अगदी तोंडावर आलेली असताना नागपूरमधील (Nagpur) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Sunil Kedar, भाजपचा झेंडा घेऊन फिरल्यास घरात घुसून मारु, नागपूरच्या काँग्रेस आमदाराची धमकी

नागपूर : विधानसभा निवडणूक (Assembly Election) अगदी तोंडावर आलेली असताना नागपूरमधील (Nagpur) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे (Congress) सावनेर येथील आमदार (Savner MLA) सुनिल केदार (Sunil Kedar) यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले, “जे कुणी भाजपचा झेंडा घेऊन फिरतील, त्यांना घरात घुसून मारू.” यानंतर सावनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आमदार केदार सिलेवाडा (Silewada) गावात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. सुनिल केदार हे काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. मात्र, आयोजकांनी आपल्याला कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नाही, असा आरोप आमदार सुनिल केदार यांनी केला. त्यावरुन कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष डाॅ. राजीव पोतदार आणि काॅंग्रेस आमदार सुनील केदार यांच्यात शाब्दिक वाद झाला. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर कार्यक्रमाच्यावेळी भाषण करताना आमदार सुनील केदार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली.


आमदार केदार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप भाजपचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे. राजीव पोतदार आज (13 सप्टेंबर) काँग्रेस आमदार सुनिल केदार यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार सुनिल केदार यांचा हा धमकीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर केदार यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *