बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 22:56 PM, 3 Mar 2021
बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार
Pankaja Munde Complaint

बीडः बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली. (Conspiracy To Disband Beed District Co-operative Bank; Pankaja Munde Complaint Directly To The Governor)

विभागीय सह निबंधक यांच्यावर राजकीय दबाव टाकून निवडणूक रद्द करण्याचा डाव

यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याची जबाबदारी शासनाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. परंतु निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणि नंतर प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक यांच्यावर राजकीय दबाव टाकून निवडणूक रद्द करण्याचा डाव आखत आहेत.

स्थगितीची कालमर्यादेचं कारण देत 75 टक्के उमेदवारी अर्ज नामंजूर

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज छाननी वेळी कोणाचेही आक्षेप नसताना स्वतः होऊन उपविधी क्र. उदा. (अ)(5) यास निकाल लागेपर्यंत स्थगिती असताना देखील सदर स्थगिती सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी प्रक्रियेतील प्रकरणाचा हवाला देऊन स्थगितीची कालमर्यादा या नावाखाली 75 टक्के उमेदवारी अर्ज नामंजूर केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत मनमानी करून पदाचा दुरूपयोग केला. छाननीच्या वेळी काही अपात्र उमेदवारांचे अर्जही त्यांनी मंजूर केलेत.

म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती. तसेच निवडणुकीच्या आक्षेपावर खुलासा करण्यासाठी वेळही दिला नाही, हे सर्व गैरप्रकार बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत झालेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या

संजय राठोडांनी राजीनामा दिला हे योग्यच; आता या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी: पंकजा मुंडे

Conspiracy To Disband Beed District Co-operative Bank; Pankaja Munde Complaint Directly To The Governor