उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - संजय राऊत

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.

उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - संजय राऊत

मुंबई : उर्मिला मातोंडकरांचा विषय हा सीएमच्या अखत्यारित आहे, कॅबिनेटचा निर्णय आहे, सीएम निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut On Urmila Matondkar)

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली, असं सांगत या विषयावर अधिक बोलणं टाळलं. उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या. राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : काँग्रेसच्या तिघा नेत्यांवर हायकमांडचे शिक्कामोर्तब, कोणाकोणाची वर्णी?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *