अबू आझमींच्या भाषणाचं दिल्ली हिंसा कनेक्शन; चौकशीसाठी अमित शाहांना पत्र

घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केल्याचंही अतुल भातखळकर म्हणालेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:27 PM, 27 Jan 2021
अबू आझमींच्या भाषणाचं दिल्ली हिंसा कनेक्शन; चौकशीसाठी अमित शाहांना पत्र
atul bhatkalkar

मुंबई: भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना एक पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील हिंसाचाराचं कनेक्शन हे आझाद मैदानातील भाषणांशी आहे का, याची चौकशी करा, असं पत्रात अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय.

अबू आझमींनी चिथावणीखोर भाषण केलं असून, त्या मागचा बोलवता धनी कोण हे शोधा, असं आवाहनही भातखळकर यांनी केलंय. घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केल्याचंही अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) म्हणालेत. (Delhi Violence Connection Of Abu Azmi Speech; Atul Bhatkalkar Letter To Amit Shah For Inquiry)

अतुल भातखळकर पत्रात लिहितात, भारतातल्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारनं तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांना भडकावत आहेत. याच विषयावर मुंबईतल्या आझाद मैदानात 25 जानेवारी 2021ला शेतकरी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनात मंचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रातील विविध नेते उपस्थित होते.


या आंदोलनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अत्यंत भडकाऊ भाषण करत लोकांना घराबाहेर पडत गोंधळ घालण्याचं आवाहन केलं होतं. त्यात मोदींबद्दल अबू आझमींनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या या मंचावरून अबू आझमींनी फक्त इतरांना भडकावण्याचं काम केलं होतं. अबू आझमींनी केलेल्या भडकाऊ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी 26 जानेवारी 2021ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालणं आणि लाल किल्ल्यावर झेंडा फटकावण्यासारख्या देशविरोधी कृत्ये केली. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असंही अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Fact Check : लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथं खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकावला का? वाचा सविस्तर

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी का होतेय?

Delhi Violence Connection Of Abu Azmi Speech; Letter To Amit Shah For Inquiry