Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

आता पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. 

Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली होती. मात्र अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  (Deputy CM Ajit Pawar corona positive)

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु तो पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *