सदसदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? न्यायालयाचे दोन निकाल तुमची कामगिरी सांगते, फडणवीसांचा हल्लाबोल

आता न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल Devendra Fadnavis Supreme Courts

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:51 PM, 27 Nov 2020
Devendra Fadnavis supreme court

मुंबईः सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर प्रहार केला आहे. (Devendra Fadnavis Criticize On Thackeray Government After High Court And Supreme Courts decision)

कंगना आणि अर्णव गोस्वामींच्या प्रकरणावर न्यायालयाचे निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सद्सद्विवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का, हा प्रश्न निर्माण होतो, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एक प्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?, असा सवालच त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. (Devendra Fadnavis Criticize On Thackeray Government After High Court And Supreme Courts decision)

मग आता न्यायालय पण सूड भावनेने वागतेय का? – प्रवीण दरेकर

भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. कंगना रनौतवर केलेल्या कारवाईबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. मग आता न्यायालय पण सूड भावनेने वागतेय,असं तुम्ही म्हणणार का?, असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे.

कंगना रनौतच्या कार्यालयावर सूड बुद्धीने झालेली कारवाई म्हणजे बीएमसीनं अधिकारांचा केलेला दुरुपयोग असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केलं. त्यामुळे आपला तो ‘पिंट्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ हा सूड बुद्धीचा प्रकार आता तरी सोडा, असा टोलासुद्धा प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीसुद्धा कंगना प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री कायद्याचे राज्य चालवण्यासाठी नेमला जातो. मनमानी करण्यासाठी राज्य म्हणजे त्यांची वडिलोपार्जित मालकी हक्काची मालमत्ता नसते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

(Devendra Fadnavis Criticize On Thackeray Government After High Court And Supreme Courts decision)

संबंधित बातम्या :

कंगनाच्या मतांशी आम्हीही सहमत नाही, पण याचा अर्थ तिचं घर पाडावं असा नाही, उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं

‘भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा’, बीएमसी उच्च न्यायालयात आक्रमक