देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, भाई जगताप कडाडले

12 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र सभागृहात आम्ही मागणी करून देखील कोणतीही कारवाई झालेली नाहीये, असे मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap ) म्हणालेत. Bhai Jagtap angry on devendra fadanvis

  • संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:37 PM, 7 Apr 2021
देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, भाई जगताप कडाडले
Bhai Jagtap, Congress

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, नैतिकता आमच्यात होती म्हणून आम्ही राजीनामा दिलेला आहे. भाजपमध्ये देखील असे अनेक नेते आहेत. केंद्रातही आहेत, राज्यातही आहेत. मात्र त्यांनी राजीनामे दिले नाहीत. 12 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र सभागृहात आम्ही मागणी करून देखील कोणतीही कारवाई झालेली नाहीये, असे मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap ) म्हणालेत. (Devendra Fadnavis should not teach us morality, Bhai Jagtap angry)

त्यातील सत्य काय आहे ते बाहेर पडले पाहिजे

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सचिन माझे प्रकरण गंभीर आहे. मात्र त्याने सांगितला म्हणून ते गंभीर आहे, असं नाही. त्याची चौकशी करून त्याच्या मुळाशी जायला हवे, त्यातील सत्य काय आहे ते बाहेर पडले पाहिजे, असंही भाई जगताप म्हणालेत.

केंद्रीय यंत्रणेचा भाजपाकडून गैरवापर

ते सत्य देशाच्या जनतेसमोर आले पाहिजे. केंद्रीय यंत्रणेचा भाजपा गैरवापर करत आहे. मग ते सीबीआय असेल एनआयए असेल किंवा निवडणूक आयोग, यांचा गैरवापर नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने सुरू केला आहे. देवेंद्र फसणवीस यांच्यासारखा माणूस हे सर्व षडयंत्र जाणीवपूर्वक करत आहे, असा गंभीर आरोपही भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलाय.

या चौकशीचं नेमकं काय झालं?

तर गेल्या काही दिवसांपूर्वीही भाई जगताप यांनी केंद्रावर निशाणा साधला होता.  सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिलं होतं. आज दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा अहवालही अद्याप आलेला नाही. या चौकशीचं नेमकं काय झालं? असा सवाल भाई जगताप यांनी केला होता.

काँग्रेसचं वेट अँड वॉच

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करणार आहे. 15 दिवसात ही चौकशी होणार आहे. अहवाल आल्यानंतर जी कारवाई व्हायची ती होईलच. तोपर्यंत त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले होते.

काँग्रेसच्या इमेजची काळजी नको

यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपने काँग्रेसची इमेज कशी झाली आहे याची काळजी करू नये. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची जी इमेज झाली आहे, ते आधी पाहावं. काँग्रेस ही गल्ली बोळातील नाही. 137 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास आहे. ही एक चळवळ आहे. काँग्रेसची काळजी भाजप नाही तर जनताच करेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

 परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?

Devendra Fadnavis should not teach us morality, Bhai Jagtap angry