…तर आज तुम्हाला हा धनंजय मुंडे दिसला नसता, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता. Dhananjay Munde Big Statement On Sharad Pawar Birthday Occasion

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:49 PM, 12 Dec 2020
...तर आज तुम्हाला हा धनंजय मुंडे दिसला नसता, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

परळीः “त्या काळात जर पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता, साहेबांचा वाढदिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे”, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत. (Dhananjay Munde Big Statement On Sharad Pawar Birthday Occasion)

बीडमध्ये शरद पवार यांचा 81 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थितांना संबोधित केलं. परळी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं मी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांचं अभीष्टचिंतन करतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मुंडे साहेबांचीही आज जयंती आहे. मुंडे साहेबांनाही सर्वाच्या वतीनं वंदन करतो. आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोहळ्याला उपस्थित परळी मतदारसंघातील माझ्या मायबाप बंधूभगिनींचे आभार मानतो. साहेबांचे उपकार फेडायचे म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. मी शरद पवार यांच्यात प्रत्यक्ष देव पाहिलाय. अडचण सोडविणारे देव माणूस पवार साहेब आहेत. परळीच्या जनतेनी 30 हजार मतांनी निवडून दिले असून, जनतेही उपकार केले आहेत. 25 वर्षांपासून मी तुमच्या सेवेत आहेत, पुढेही राहीन, असंही मुंडे म्हणाले आहेत.

21 वर्षांनंतर पुन्हा एकदा गोविंदा सपत्नीक परळीत

साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज परळी इथे पुन्हा एकदा गोविंदांचं आगमन झालं आहे. जे माझे जीवलग मित्र आहेत, ज्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. आज माझ्या विनंती मान देऊन चिची भय्यासोबत भाभीसुद्धा आल्या आहेत. 21 वर्षांनंतर पुन्हा गोविंदाजी सपत्नीक परळी आले, मी त्यांचे स्वागत करतो. साहेबांचे अनेक वाढदिवस साजरे केले, आज एवढा अभूतपूर्व वाढदिवस यासाठी साजरा करतोय, त्या काळात जर साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता, साहेबांचा वाढदिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असंही धनंजय मुंडेंनी अधोरेखित केलं आहे. Dhananjay Munde Big Statement On Sharad Pawar Birthday Occasion

गोविंदांना परळीत बोलवण्याचं कारण काय हा अनेकांना पडलेला प्रश्न असेल. मुंडे साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना 12 डिसेंबर 1999लाच वाढदिवस साजरा करताना गोविंदा परळीत आले होते. त्यावेळी भाषणात ते बोलले होते, धनू तू आगे बढेगा, तेव्हापर्यंत मला कोणी मी पुढे जाईन, असं म्हटलं नव्हतं. पहिल्यांदाच गोविंदानं मला आगे बढेगा असं म्हटलं होतं, अशा आठवणींनाही धनंजय मुंडेंनी उजाळा दिला आहे.

Dhananjay Munde Big Statement On Sharad Pawar Birthday Occasion

इतर बातम्या 

Sharad Pawar Birthday | विरार का छोरा, करणार परळीचा दौरा!

UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?