शैक्षणिक नुकसान थांबवता येणार नाही, SEBC अंतर्गत अ‍ॅडमिशन नाही : अशोक चव्हाण

मराठा आरक्षण स्थगिती देणार नाही, चुकीची गैरसमज काही संघटना मुद्दाम पसरवत आहे, असा खुलासाही अशोक चव्हाणांनी केला आहे. (Educational Loss Cannot Be Stopped, No Admission Under SEBC Says Ashok Chavan)

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:22 PM, 25 Nov 2020

मुंबईः विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मुंबईत ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Educational Loss Cannot Be Stopped, No Admission Under SEBC Says Ashok Chavan)

मराठा आरक्षणाला स्थगिती देणार नाही, चुकीचा गैरसमज काही संघटना मुद्दाम पसरवत आहेत, असा खुलासाही अशोक चव्हाणांनी केला आहे. घटनापीठ स्थापन करण्यासाठी चार वेळा लेखी अर्ज सरकारने न्यायालयात केला. न्यायालय तारीख देईल, त्यावर टिपण्णी करणे योग्य नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार नाहीत. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असेल, असं शासन आदेशात ठाकरे सरकारने सांगितलं आहे. (Educational Loss Cannot Be Stopped, No Admission Under SEBC Says Ashok Chavan)

सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले आहे. तसेच हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असंही सरकारनं सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर 2020-21 शैक्षणिक वर्षातील 9 सप्टेंबर 2020 नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षित न ठेवता पार पाडण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबर 2020 पूर्वी एईसीबी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्जे केले असतील, परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याचंही ठाकरे सरकार म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

(Educational Loss Cannot Be Stopped, No Admission Under SEBC Says Ashok Chavan)