महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात; एकनाथ खडसेंचे कन्फ्यूज करणारे वक्तव्य

2019 सली भाजपा हा एकटा पडला होता तो शरद पवारांच्या निर्णयामुळेच असा दावा देखील खडसेंनी केला आहे.

महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात; एकनाथ खडसेंचे कन्फ्यूज करणारे वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
वनिता कांबळे

|

Oct 02, 2022 | 8:44 PM

मुंबई : राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी आणखी एक कन्फ्यूज करणारे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार(sharad pawar) बदलू शकतात असं एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे राजकीय स्थिती बदलू शकतात असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.

राज्याच्या राजकीय निर्णयांमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्यामुळे अनेक निर्णय राष्ट्रवादीच्या बाजूने झाले असल्याचा दावा देखील एकनाथ खडसेंनी केला आहे.

हल्लीच्या काळात शरद पवारांनी बैठका घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेने व काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता आणलं होती याची आठवण देखील खडसे यांनी करुन दिली आहे.

2019 सली भाजपा हा एकटा पडला होता तो शरद पवारांच्या निर्णयामुळेच असा दावा देखील खडसेंनी केला आहे. शिंदे गटाचे 50 आमदार अस्वस्थ असल्याचा दावाही एकनाथ खडसेंनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये मंत्रिपद मिळण्याबाबत मतभेद आहेत.यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा गौप्यस्फोट देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें