Remote Control Of Power: किंग नाही, आता किंगमेकर? फडणवीसांच्या निर्णयानं देशभरात कुतूहल, सत्तेचा नवा रिमोट कंट्रोल

भाजपकडे १२०चा आकडा असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपद भाजपही घेऊ शकले असते. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत: मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी या सत्ता संघर्षाच्या लढाईत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट आणला.

Remote Control Of Power: किंग नाही, आता किंगमेकर? फडणवीसांच्या निर्णयानं देशभरात कुतूहल, सत्तेचा नवा रिमोट कंट्रोल
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 6:14 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी त्यांच्यासह गेलेल्या आमदारांनी एकमुखाने केली होती. अखेरीस त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.  शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकानाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली आहे(New CM Of Maharashtra). मी कोणतेही मंत्रीपद घेणार नाही. मी सत्तेतच्या बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलंय. यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल (Remote Control Of Power) देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात राहील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

भाजपकडे १२०चा आकडा असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला

भाजपकडे १२०चा आकडा असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला.  मुख्यमंत्रीपद भाजपही घेऊ शकले असते. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवत देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत: मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी या सत्ता संघर्षाच्या लढाईत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट आणला.

त्यांच्या इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. त्यांच्या इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही असे एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले. मोदी शहा, फडणवीसांचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. कुणाला मंत्रिपद पाहिजे असं नाही. मी कुठलीही अपेक्षा केली नव्हती. पण जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे असे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात एक मजबूत सरकार येईल, मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल

राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ. ते आमच्यासोबत आहेत. त्यांचं मार्गदर्शन राहील. त्यांनी उदारता दाखवली. ही उदारता दुर्मिळ आहे असं म्हणत पुन्हा एकदा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.  महाराष्ट्रात एक मजबूत सरकार येईल. मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासात कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कटिबद्ध आहे असे शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.