Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी, सेनेत हकालपट्टीचं सत्र

पक्षविरोधी काम केल्याचा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे.

Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी, सेनेत हकालपट्टीचं सत्र
शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटीलांची सेनेतून हकालपट्टीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:38 AM

मुंबई : शिवसेनेतून (shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षापासून दूर करण्याचं सत्र सुरू केलंय.

शिंदेंना शुभेच्छा दिल्यानंतर कारवाई

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.

 शिवाजीराव आढळराव पाटलांचं ट्विट

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?

  1. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत.
  2. 2004 साली ते पहिल्यांदा निवडून आले होते.
  3. 2009 आणि 2014 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली होती.
  4. सलग 15 वर्ष ते खासदार राहिले आहेत.
  5. 2019 मध्ये त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती.
  6. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.
  7. शिवाजीराव आढळराव पाटील हे पुणे जिल्ह्यातल्या शिरुर मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात.
  8. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

का कारवाई करण्यात आली?

एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे.

शिवसेनेला गळती, शिंदे गट वाढतोय!

राज्यात एकीकडे शिवसेनेतून वेगळी वाट पकडलेला शिंदे गट वाढत असून दुसरीकडे शिवसेनेत गळतीचं सत्र सुरू झालंय. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात हकालपट्टी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्यानं मोठा शिरुर मतदारसंघात आता काय होणार, पाटील यांचे समर्थकही त्यांच्यासोबत जाणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

शिवसेनेत हकालपट्टीचं सत्र

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटानं वेगळं वळण घेतल्यानं सेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला फटका बसत असून एकीकडे हकालपट्टी सुरू आहे. तर दुसरीकडे समर्थ शिंदे गटात सामील होत आहे. यामुळे ही फूट वाढतच जात असल्याचं दिसतंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.