‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

या विजयानंतर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. सतेज ऊर्फ बंटी पाटलांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ देऊन टाकलीय. Gokul Dudh Sangh Election Final Result Satej Patil

  • आश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 21:56 PM, 4 May 2021
'गोकुळ' जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ
satej patil

कोल्हापूरः गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif), खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik ) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवलाय. या विजयानंतर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. सतेज ऊर्फ बंटी पाटलांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ देऊन टाकलीय. (Gokul Dudh Sangh Election Final Result Big Announcement Of Satej Patil After Winning ‘Gokul’, Direct Price Hike Milk Of Rs 2 For Farmers)

आता नवा अजेंडा असणार

काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलीय. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झालाय. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलंय. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं, यावरून आम्ही निवडून आलोय. आता नवा अजेंडा असणार आहे, असंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय.

मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार

विशेष म्हणजे आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून, आमच्या शब्दात कोठेही मागे पडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. प्रस्थापित व्यवस्थेतील उणिवा दूर करायच्यात, आम्ही मोठी धडक दिलीये, जिल्ह्यातून आमचं कौतुक होतेय. चार जागा गेल्या याचं पॅनल प्रमुख म्हणून दुःख होतेय, पण लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होतं, असंही सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणालेत.

तीन दशकांनंतर कोल्हापुरात दूध संघात परिवर्तन

तीन दशकांनंतर कोल्हापुरात दूध संघात परिवर्तन झालंय. या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं बाजी मारली असून, गोकुळमध्ये अखेर सत्तांतर झालंय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळालाय. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. या निमित्तानं आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आलीय.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात 30 वर्षांनंतर सत्तांतर, सतेज पाटलांचा महाडिकांना धोबीपछाड

Live Gokul Dudh Sangh Election Final Result | महाडिकांच्या सत्तेला सुरुंग, 3 दशाकानंतर परिवर्तन, सतेज पाटील गटाचा 17 जागावंर विजय

Gokul Dudh Sangh Election Final Result Big Announcement Of Satej Patil After Winning ‘Gokul’, Direct Price Hike Milk Of Rs 2 For Farmers