पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताय? ‘या’ रंगाचा पेन वापरावा लागणार…

 इतर पेन, बॉलपेन किंवा पेन्सिल वापरू नये, असे आवाहन निवडणूक आयोगांच्या सूचनांनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताय? 'या' रंगाचा पेन वापरावा लागणार...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 9:43 AM

मुंबईः राज्यातील विधान परिषद  निवडणुकांच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर रोजदार राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) बिघाडी संपायचं नाव घेत नाहीये तर भाजपच्या (BJP) मनातले खरे डावपेच काय असावेत, याचे अजूनही आडाखेच बांधले जात आहेत. थेट मतदानाच्या दिवशीपर्यंत आणखी काय काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यातच निवडणूक आयोगातर्फे महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जे नागरिक मतदान करणार आहेत, त्यांनी जांभळ्या रंगाचा स्केच पेनच वापरावा, अशा सूचना आयोगामार्फत देण्यात आल्या आहेत.

आणखी काय सूचना?

  • येत्या 30 जानेवारी रोजी विधान परिषदेचत्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
  •  यावेळी मतदारांनी मतदानासाठी मतपत्रिकेसोबत दिलेला जांभळ्या रंगाचाच स्केच पेन वापरावा.
  •  इतर पेन, बॉलपेन किंवा पेन्सिल वापरू नये, असे आवाहन निवडणूक आयोगांच्या सूचनांनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
  •  पसंती क्रम दर्शवताना संबधित कॉलमखालील जागेत आपल्याला ज्या उमेदवाराला प्रथम पसंती द्यायची आहे, त्याच्या नावासमोर क्रमांक १ लिहून मतदान करायचे आहे.
  •  जेवढे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तेवढ्या संख्येनुसार मतदारांना पसंतीक्रम नोंदवता येऊ शकतो.
  • पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर क्रमांक 1 लिहिल्यानंतर उर्वरीत उमेदवारांच्या नावापुढे पुढील क्रमांक दर्शवता येतील. उदा. 2,3,4… असा पसंतीक्रम दर्शवता येईल.
  •  एका उमेदवाराच्या नावापुढे फक्त एकच संख्या लिहावी. एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावापुढे एकच संख्या लिहू नये.
  •  पसंतीक्रम दर्शवताना भारतीय संख्यांचे आंतरराष्ट्रीय स्वरुप जसे 1,2,3,4 असे लिहावे.
  • किंवा रोमन लिपीनुसार एक, दोन , ती इत्यादी अथवा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषेत लिहावे.
  •  मतदारांनी मतपत्रिकेवर कोठेही सही करू नये किंवा नाव, अक्षरे लिहू नयेत.
  •  अंगट्याचा ठसादेखील उमटवू नये.
  •  मतपत्रिकेवर कुठेही क्रॉस अथवा इतर खूण करू नये, अन्यथा मतपत्रिका बाद होईल.
  •  विशेष म्हणजे मतपत्रिका वैध होण्यासाठी मतदाराने मतपत्रिकेतील कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे 1 हा पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे.
  •  इतर पसंतीक्रम नोंदवणे मतदाराच्या इच्छेवर अवलंबून आहे, असेही निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कुठे कुठे निवडणूक?

विधान परिषदेच्यी तीन शिक्षक मतदारसंघ तसेच दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात नाशिक, अमरावती या दोन ठिकाणी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होतील. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या तीन ठिकाणी शिक्षक मतदार संघांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.