मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा नुकताच उडाला असून, आता सगळ्या राजकीय पक्षांचे स्थानिक आघाड्यांकडे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर होण्याआधीच यातील सदस्य आपल्याकडे कसे येतील, त्यासाठी जाळं टाकण्याच्या हालचाली वाढल्यात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने 6 हजार जागा जिंकल्याचा दावा केलाय, तर काँग्रेसनेही 4 हजार जागा जिंकल्याचा दावा केलाय. तर राष्ट्रवादीच राज्यात नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केलाय. प्रत्येकाने आपणच नंबर वनचा दावा केला असला तरी सरपंच निवडणुकीनंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra : Which Party Has How Many Gram Panchayats; Will Local Leads Do Miracles?)
सगळ्याच पक्षांनी या निवडणुका एकत्र लढवल्या नव्हत्या. पण राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळालं. स्थानिक आघाड्यांचा पण आकडा जवळपास अडीच हजारांच्या आसपास आहे. आता या आघाड्या आपल्याकडे खेचण्यासाठी सगळ्या पक्षांनी हालचाली सुरू केल्यात. ज्यांच्याकडे स्थानिक आघाड्यांचे सरपंच जास्त होतील, त्या पक्षाचा दबदबा वाढणार आहे. स्थानिक पातळीवर ज्याचा ताकदवार नेता त्याचीच चलती असणार आहे. कुठं राष्ट्रवादीला पाडण्यासाठी बाकी सगळे पक्ष एकत्र येतील. तर कुठं सेना-काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येतील. येणा-या काळात मोठं राजकीय खलबतं रंगणार आहेत.
सध्या राज्यात भाजप 3263 ग्रामपंचायतींवर ताबा मिळवत एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलाय. तर त्या मागोमाग राष्ट्रवादी काँग्रेसनं 2999 ग्रामपंचायतींवर कब्जा केलाय. तर ग्रामपंचायती निवडणुकीत शिवसेना थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली असून, शिवसेनेकडे 2808 ग्रामपंचायती आहेत. तसेच काँग्रेसनं 2151 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर मनसेला अवघ्या 38 ग्रामपंचायतींवर विजय मिळवलं शक्य झालंय. विशेष म्हणजे ग्रामपंचायती निवडणुकीत स्थानिक आघाड्यांनीही मोठा चमत्कार केलाय. स्थानिक आघाड्यांनी 2510 ग्रामपंचायतींवर ताबा मिळवलाय.
गावचा विकास करायचा असेल तर मोठा निधी खेचून आणावा लागतो. त्यामुळे स्थानिक आघाड्यांचा सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा कल अधिक असतो. असं असलं तरी प्रत्येक पक्षाचा स्थानिक आमदार सर्वाधिक सरपंच आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार कामाला लागलेत. येत्या 8 ते 10 दिवसात सरपंच सोडत जाहीर होणार असून, तेव्हाच खरी रंगत बघायला मिळणार आहे. आगामी काळात पालिका, जिल्हा परिषदा, सहकारी बँकांच्या निडणुका होणार आहेत, त्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचयातील ताब्यात कशा येतील त्याबाबत खलबतं सुरू झाली आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं सध्या चित्र निर्माण झालंय.
संबंधित बातम्या
ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra : Which Party Has How Many Gram Panchayats; Will Local Leads Do Miracles?