देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, तर आता काँग्रेसनंही देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस घेण्यावरून निशाणा साधलाय. devendra Fadnavis Tanmay Fadanvis

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:50 AM, 20 Apr 2021
देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल
devendra Fadnavis Tanmay Fadanvis

मुंबईः राज्यावर कोरोनाचं मोठं संकट असून, सत्ताधारी आणि विरोधक या संकटाच्या काळातही एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतलेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, तर आता काँग्रेसनंही देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस घेण्यावरून निशाणा साधलाय. (How can devendra Fadnavis nephew Tanmay Fadanvis, who is less than 45 years old, get vaccinated ?, Congress criticize)

तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्याच फोटोवरून आता महाराष्ट्र काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना कचाट्यात पकडलंय. 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवालच काँग्रेसनं उपस्थित केलाय. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!, असंही टीकास्त्र काँग्रेसनं ट्विट करत सोडलंय.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते. तोच फोटो ट्विट करत काँग्रेसनं आता देवेंद्र फडणवीसांनाच घेरलंय.


संबंधित बातम्या

ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभे होणार, राज्य सरकारचा निर्णय

प्रशासनाकडून मान्यता नसताना कोरोना हॉस्पिटल सुरु, काही रुग्णांचा मृत्यू, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

How can devendra Fadnavis nephew Tanmay Fadanvis, who is less than 45 years old, get vaccinated ?, Congress criticize