आमचा पक्ष हा सर्वधर्मसमभाव मानतो. तो सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे, असंसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं आहे. I Don’t Know About Shiv Sena, But Our Party Is Multi Religious; Says Sharmila Thackeray
मुंबईः “शिवसेनेबद्दल माहीत नाही, पण आमचा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा आहे”, असं राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. गजानन राणे यांच्या दादर इथल्या श्रमिकगड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. (I Don’t Know About Shiv Sena, But Our Party Is Multi Religious; Says Sharmila Thackeray)
इतर पक्षाने काय केलं हे आम्हाला ठाऊक नाही, पण आमचा पक्ष हा मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आग्रही राहील. वीजबिलात सवलत द्यायची असती तर ती कधीच दिली असती, त्यांना मुळात बिल कमी करायचं नाही आहे, चक्रवाढ व्याज लावून बिलं पाठवली जात आहेत, गोरगरीब बिलं कशी भरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण मिळायलाच हवं ही राज ठाकरेंची भूमिका आधीपासूनच होती. त्यांना न्याय मिळाला नाही की बंड होणारच, असंसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं आहे. सेना अजानबद्दस काय बोलली, त्यापेक्षा आमचा पक्ष हा सर्वधर्मसमभाव मानतो. तो सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे, असंसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं आहे.
तत्पूर्वी भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं सांगतानाच अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं होतं.
मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं होतं.
मुस्लिम समाजातील लहान मुले अप्रतिम अजान देतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देणं हा त्या मागचा हेतू आहे. अशी स्पर्धा देशात कुठे झाली असेल असं वाटत नाही. हा पहिलाच प्रयोग असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असंही ते म्हणाले होते.
I Don’t Know About Shiv Sena, But Our Party Is Multi Religious; Says Sharmila Thackeray
संबंधित बातम्या
तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच का? शर्मिला ठाकरेंचं दिलखुलास उत्तर