तुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टि्वट करत लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटणार असल्याचं सांगितलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:15 PM, 20 Jan 2021
तुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट
राज ठाकरे

मुंबईः ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात आपणच नंबर वनच स्थान पटकावलंय. राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या तर शिवसेना आणि काँग्रेसने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्यात. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेनंही चांगलाच जोर मारल्याचं चित्र आहे. राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती मनसेनं ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) टि्वट करत लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटणार असल्याचं सांगितलंय. (I Will Meet You All Soon, Raj Thackeray First Tweet After The Gram Panchayat Elections)

ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असंसुद्धा मनसे नेते राज ठाकरेंनी ट्विट करत सांगितलंय.


विशेष म्हणजे राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेनं स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलंय. मनसेने अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवत ग्रामपंचायतीत झोकात एण्ट्री केली. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने दणदणीत विजय मिळवला.

यवतमाळमध्ये झंझावात

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या (Gram panchyat election results) सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

अहमदनगरमध्येही खातं उघडलं

अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे.

आणखी कोणत्या ग्रामपंचायींवर मनसेचा झेंडा

* सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर मनसेने विजय मिळवला.
* अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे 9 सदस्य विजयी
* अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे 07 पैकी 07 उमेदवार विजयी
* आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईचं दार ठोठावलं, BMC पासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत जिंकली

Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

I Will Meet You All Soon, Raj Thackeray First Tweet After The Gram Panchayat Elections