IPS विश्वास नांगरे पाटील ‘सिल्वर ओक’वर, धनंजय मुंडे प्रकरणात पवारांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील दाखल झाले असून, त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली आहे.

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:17 PM, 14 Jan 2021
IPS Vishwas Nangre Patil

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट पवारांच्या भेटीला पोहोचलेत. सिल्व्हर ओकवर विश्वास नांगरे पाटील दाखल झाले असून, त्यांनी शरद पवारांशी चर्चा केलीय. (IPS Vishwas Nangre Patil On ‘Silver Oak’, discussion With Sharad Pawar On Dhananjay Munde Case?)

धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. विश्वास नांगरे पाटलांनी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

किशोरी पेडणेकरांनी केला होता थेट विश्वास नांगरे पाटलांना कॉल

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनासुद्धा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी थेट विश्वास नांगरे पाटलांना कॉल केला होता. त्यावेळीही नांगरे पाटलांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संबंधित आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. आता धनंजय मुंडे प्रकरणातही विश्वास नांगरे पाटील मैदानात उतरले आहेत, त्यामुळे ते हे प्रकरण कशा पद्धतीनं सोडवतात हे लवकरच समजणार आहे.

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार की राहणार?, राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीत ठरणार

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

IPS Vishwas Nangre Patil On ‘Silver Oak’, discussion With Sharad Pawar On Dhananjay Munde Case?