Ajit Pawar : शपथविधीच्या काही तास आधी अजित पवारांच मोठ स्टेटमेंट,महायुतीत एकवाक्यता नाही का?

Ajit Pawar : शपथविधीच्या काही तास आधी अजित पवार यांनी एक मोठ स्टेटमेंट केलय. त्यावरुन महायुतीत शपथविधीवरुन एकवाक्यता नसल्याच दिसत आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Ajit Pawar : शपथविधीच्या काही तास आधी अजित पवारांच मोठ स्टेटमेंट,महायुतीत एकवाक्यता नाही का?
देवेंद्र फडणवीस, एनाथ शिंदे, अजित पवार Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 1:07 PM

आज मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज फक्त तिघांचाच शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याला काही तास उरले असताना अजित पवार यांनी एक मोठ स्टेटमेंट केलं आहे. कालपासून फक्त तीन नेत्यांचा शपथविधी होणार की अन्य मंत्र्यांचा सुद्धा अशी चर्चा रंगली आहे. सध्यातरी कुठल्याही आमदाराला फोन गेलेला नाही. त्यामुळे आज तिघांचाच शपथविधी होईल असं दिसतय.

दरम्यान शपथविधी सोहळ्याला काही तास उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी एक मोठ स्टेटमेंट केलय. “सगळ्यांचा शपथविधी आज व्हायला पाहिजे, असं मी म्हणत होतो. पण आज तिघांचा शपथविधी करु असं म्हणालेत. हरियाणा, आंध्रप्रदेशमध्ये सगळ्यांचा शपथविधी एकत्रितच झाला होता” असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या स्टेटमेंटवरुन महायुतीत शपथविधी सोहळ्यावरुन एकवाक्यात नसल्याच दिसून येतय. काल राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करताना त्यानंतर पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये सर्व काही परस्पर सहमतीने, विश्वासाने होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काय?

अगदी काल रात्रीपर्यंत आज एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही? हे सुद्धा स्पष्ट नव्हतं. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तिन्ही नेत्यांच एकत्रित काही ठरलं, तर दुपारी 1 वाजेपर्यंत एखादा निर्णय आला तर काही मंत्री शपथ घेतील, असं म्हटलं होतं. आता ती शक्यता सुद्धा नाहीय. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधीपर्यंत होईल, या बद्दलही शिरसाट बोलले. संजय शिरसाट यांनी 12 किंवा 13 डिसेंबरपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं सांगितलं.

'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.