शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती

सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Prajakt Tanpure school reopening)

शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती

अहमदनगरः शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे. मुलं घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, असंही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले आहेत. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होते. (It Is Not Compulsory To Come To School Even If School Starts; Minister Of State Prajakt Tanpure)

तसेच सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितल्याचे तनपुरे यांनी अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सेक्रेटरीशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून ऑनलाईन शिक्षण चालू राहील, असंसुद्धा प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे.

राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन असेल, ते मॅनेज कसं करायचा असा प्रश्न शिक्षक आणि प्रशासनासमोर आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अन्य जिल्ह्यात शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. (It Is Not Compulsory To Come To School Even If School Starts; Minister Of State Prajakt Tanpure)

औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरु होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र महापालिका क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहतील असं, पालिका आयुक्तांनी सांगितलं.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद 

‘पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार’, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती, 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार, पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय, पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार आहेत.

(It Is Not Compulsory To Come To School Even If School Starts; Minister Of State Prajakt Tanpure)

संबंधित बातम्या  

शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *