कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं; वैदिक परंपरा मान्य करा, प्रकाश आंबेडकरांचा ओवेसींना सल्ला

अशी वक्तव्यं समाजात विघटन घडवून आणतात, प्रकाश आंबेडकरांचा ओवेसींवर निशाणा (Prakash Ambedkar criticize Owaisi )

कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं; वैदिक परंपरा मान्य करा, प्रकाश आंबेडकरांचा ओवेसींना सल्ला

नागपूरः कुठल्याही धर्माला ओवेसी यांनी कमी लेखणं चुकीचं आहे. वैदिक परंपरा त्यांना मान्य करावी लागेल. अशी वक्तव्यं समाजात विघटन घडवून आणतात, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींवर केला आहे. नागपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ओवेसींना त्यांनी खडे बोल सुनावले. (It Is Wrong To Underestimate Any Religion; Accept The Vedic Tradition Says Prakash Ambedkar)

“राजकीय शक्ती एकाच धर्माकडे किंवा समाजाकडे राहील या खोट्या धारणेवर हिंदुत्वाची प्रतिमा उभी केली आहे. शिवाय मुस्लिमांना राजकारणात भाग घेण्याचा कोणताही हक्क असू नये, असंही त्यातून दर्शवण्याचा खोटा प्रयत्न आहे. संसद किंवा विधिमंडळातील आमचं संख्याबळ हे हिंदुत्व आणि संघाला आव्हान आहे. आमचं अस्तित्व रोखल्यास संघ नक्कीच त्याचा उत्सव साजरा करेल”, असंही ट्विट ओवेसींनी केलं होतं. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. प्रकाश आंबेडकरांनीही ओवेसींचं हे विधान खोडून काढलं आहे. (It Is Wrong To Underestimate Any Religion; Accept The Vedic Tradition Says Prakash Ambedkar)

हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही: देवेंद्र फडणवीस

तर देवेंद्र फडणवीसांनीही ओवेसींवर पलटवार केला होता. हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होतं. देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आण समाधानाने नांदत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले होते.

तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

(It Is Wrong To Underestimate Any Religion; Accept The Vedic Tradition Says Prakash Ambedkar)

संबंधित बातम्या:

हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही: देवेंद्र फडणवीस

‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *