'त्या' शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं, जितेंद्र आव्हाडांचा राज्यपालांवर पलटवार

ज्यांना ज्यांना संविधान समजतो, त्यांना राज्यपालांचं हे पत्र पटलेले नसल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. 

'त्या' शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं, जितेंद्र आव्हाडांचा राज्यपालांवर पलटवार

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून सत्ताधारी पक्षानं राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही त्या पत्रावरून राज्यपालांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. आता गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज्यपालांच्या पत्रावर टीकास्र सोडलं आहे.(Jitendra Awhad criticize on Governor )

संविधानाचा जो ढाचा आहे, त्या संविधानातून निर्माण झालेली ही पदं आहेत. या संविधानातील एका शब्दाचा आधार घेत पत्र लिहायचं आणि त्या शब्दाला विरोध असल्याचं दाखवायचं. ‘त्या’ शब्दाला विरोध म्हणजे पूर्ण संविधानालाच विरोध करण्यासारखं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वांना एकत्र ठेवते. त्यात असा शब्दच्छल करणं चुकीचं होतं. आज जे काही अमित शाह बोलले ते योग्यच आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल संविधानाचे रक्षणकर्ते आहेत, त्यांनी असं अचानकपणे म्हणणे धक्कादायक आणि घटना विरोधी होते. ज्यांना ज्यांना संविधान समजते, त्यांना राज्यपालांचं हे पत्र पटलेले नसल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

तसेच शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. त्यावर आव्हाड म्हणतात, शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेला एक वर्ष झालं. शरद पवारांचा उभा जन्म हा जनसेवेसाठीच झालेला आहे. सभेदरम्यान जोरदार पाऊस पडला आणि साहेबांनी छत्री न घेता सभेला संबोधित केलं. आणि त्या दिवशी सर्व राजकीय दिशा बदलल्या.

आज परत लोकांचे अश्रू पुसण्यासाठी ते बांधावर गेले आहेत. माझ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू असताना कोणताही धोका असला तरी तिथे बांधावर जाण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे. वय 80 वर्षं आहे. शरद पवार आणि आव्हान एक मिळत जुळत नातं असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी अधोरेखित केलं आहे. विरोधी पक्षाचा दौरा हा उपयोगी पडत असतो, काही उपयुक्त माहितीही मिळत असते. विरोधी पक्ष आणि सरकार जेव्हा एकत्र येत असतात, तेव्हा जनतेचं भलं होत असतं. ते जर दौरा करणार असतील आणि सरकारला काही सूचना करणार असतील तर त्या स्वागतार्हच आहेत. दौऱ्याचा उपयोग ही होत असतो, असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

पूर परिस्थितीची पाहणी करत असतील, तर हे योग्यच आहे, कारण ते मुख्यमंत्र्यांच कामच आहे. कुणाला काहीही म्हणायची संविधानाने नारायण राणेंना मुभा दिली आहे, त्यामुळे कुणाला त्यांनी काही ही म्हणावं त्यात आक्षेप असण्याचं कारण नसल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeray | माझ्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

ये बापू हमारे सेहतके लिये हानिकारक हैं, राज्यपालांना बडतर्फ करा; माकपची मागणी

(Jitendra Awhad criticize on Governor )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *