कर्म मराठा, धर्म मराठा ब्रिदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान; सकल मराठा समाजाचा एल्गार

कर्म मराठा, धर्म मराठा ब्रिदवाक्याने मराठा जोडो अभियान सुरू करणार (Karma Maratha, Dharma Maratha)

  • साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी
  • Published On - 16:29 PM, 24 Nov 2020

कोल्हापूरः इचलकरंजी शहरामध्ये आज मराठा समाजाचे आरक्षणासह अन्य न्याय हक्कांसाठी वेगवेगळे लढण्याऐवजी सर्वांनी एकजुटीने ताकदीने हक्क मिळविण्यासाठी कार्यरत झालो आहोत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र आलो आहोत. कर्म मराठा, धर्म मराठा हे ब्रिदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते पुंडलिक जाधव आणि शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी दिली. (Karma Maratha, Dharma Maratha Maratha Jodo Abhiyan; Maratha Community Goal)

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा संघटनांना एकत्र करून इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी केली आहे. त्याची कार्यकारिणी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

सकल मराठा समाज इचलकरंजी शहर अध्यक्षपदी पै. अमृत भोसले, कार्याध्यक्षपदी मोहन मालवणकर तर उपाध्यक्षपदी अमरजित जाधव, अरविंद माने, खजिनदारपदी भारत बोंगार्डे, सचिवपदी शशिकांत मोहिते, सहसचिवपदी वैभव खोंद्रे यांची आणि सदस्यपदी रणजित जाधव, किसन शिंदे, राजवर्धन नाईक, नितीन कोकणे, नितीन पाटील, मनोज साळुंखे, शहाजी भोसले, संतोष सावंत, प्रमोद खुडे, विठ्ठल येसाटे, प्रसाद जाधव, नागेश पाटील, गणेश जाधव, उदय निंबाळकर, किशोर निंबाळकर, अजित शिंदे, अभिजित रवंदे, दिलीप पाटील शिवाजी पाटील व सागर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रवक्तेपदी पुंडलिक जाधव, पै. अमृता भोसले, मोहन मालवणकर आणि दीपक रावळ यांची तर सिव्हिक बोर्डात आबा जावळे, पुंडलिक जाधव, उदय लोखंडे, आनंदराव नेमिष्टे, बंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रकाश मोरबाळे, सुनील शेलार, संजय जाधव, सचिन हळदकर, राजाराम बोंगार्डे व रवींद्र माने यांची निवड करण्यात आली आहे. Karma Maratha, Dharma Maratha Maratha Jodo Abhiyan; Maratha Community Goal

आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासह एकजुटीने कार्यरत राहणार- सकल मराठा

मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह समाजासाठी विकासात्मक कामे करणे, समाजातील नवयुवकांसाठी शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात काम करणे, सर्वच विभागाचे परीक्षण करुन विभागनिहाय कमिट्या तयार करणे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सामावून घेऊन कार्यरत राहणे या उदात्त हेतूने शहर आणि परिसरातील सर्व मराठा समाजबांधवांना व संघटनांना एकत्र केले आहे.

आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासह सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्यासाठी ही कार्यकारिणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहर कार्यकारिणी, सिव्हिक बोर्ड आणि प्रवक्ते यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठा जोडो अभियान राबवत भागाभागात बैठका घेऊन जनजागृती केली जाणार आहे. याप्रसंगी प्रा. युवराज मोहिते, किसन शिंदे, राजाराम बोंगार्डे आदींसह मराठा समाजातील युवक, ज्येष्ठ उपस्थित होते. Karma Maratha, Dharma Maratha Maratha Jodo Abhiyan; Maratha Community Goal

Karma Maratha, Dharma Maratha Maratha Jodo Abhiyan; Maratha Community Goal

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा