KDMC Election 2022, Ward (1): प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेसमोरील आव्हानात वाढ, यंदा विजय मिळणार का?

KDMC Election प्रभाग क्रमांक एकमध्ये उंबर्डे गाव, आयटीआय उंबर्डे, मुथा कॉलेज, घुमटयाचा पाडा, कोळीनली, कै. प्रल्हाद शिंदे स्मारक, अशापुरा क्राऊन सिटी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

KDMC Election 2022, Ward (1): प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेसमोरील आव्हानात वाढ, यंदा विजय मिळणार का?
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 2:20 AM

कल्याण : कल्याण, डोंबिवली महापालिकेची निवडणूक (KDMC Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महापालिकेसाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. प्रमुख पक्षांनी प्रचारालाही सुरुवात केल्याचे चित्र आहे. 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना(Shiv sena) हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. कल्याण, डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने 52 जागांवर विजय मिळवला होता. तर 42 जागा जिंकून भाजप (BJP) दुसऱ्या आणि मनसेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र सध्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या बंडोखोरीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवणे हे शिवसेसमोरील मोठे आव्हान असणार आहे. वार्ड क्रमांक एक बाबत बोलायचे झाल्यास गेल्यावेळी वार्ड क्रमांक एक मधून शिवसेनेच्याच उमेदवाराने बाजी मारली होती. वार्ड क्रमांक एकमधून शिवसेनेचे उमेदवार जयवंत भोईर यांनी बाजी मारली होती.मात्र यंदा प्रभागाच्या रचनेत देखील बदल करण्यात आल्याने सर्वच पक्षांना याचा कमी, अधिक प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक एकमधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक एकमध्ये उंबर्डे गाव, आयटीआय उंबर्डे, मुथा कॉलेज, घुमटयाचा पाडा, कोळीनली, कै. प्रल्हाद शिंदे स्मारक, अशापुरा क्राऊन सिटी, शंखेश्वर पल्स, शंखेश्वर पॅटिनम, मंगेशी सिटी, रुतु कॉम्प्लेक्स, महावीर रिव्हर व्हॅली, रॉयस, गॅलक्सी, मोहन अल्टेजा, के.एम. अग्रवाल कॉलेज, वसंत पार्क, मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र या प्रमुख प्रभागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक एकची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक एकची एकूण लोकसंख्या ही 31162 इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 3618 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1525 एवढी आहे.

हे सुद्धा वाचा

2015 मधील चित्र काय?

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेने बाजी मारली होती. या प्रभागामधून शिवसेनेचे उमेदवार जयवंत भोईर हे विजयी झाले होते. मात्र यंदा प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. एका प्रभागाचे तीन वार्ड अ, ब, क अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे याचा कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षणांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर या वार्डमधून पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल का याबाबत अद्याप तरी कुठलाही अंदाज वर्तवता येत नाही.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार केडीएमसी महापालिकेचा प्रभाग क्रमांक एक अ हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक एक ब हा अनारक्षित आहे, तर प्रभाग क्रमांक क हा अनुसूचित जातीसाठी आरक्षीत आहे.

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 क

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

2015 च्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकत शिवसेना हा मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपाने 42 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले होते, तर मनसेच्या वाट्याला 9 जागा आल्या होत्या. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होत आहेत. या बंडखोरीचा फटका हा शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत बसू शकतो, दुसरीकडे भाजपासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.