KDMC Election 2022, Ward (4) : प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी शिवसेनेचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?

KDMC Election प्रभाग क्रमांक चारमध्ये गौरीपाडा तलाव, मातृछाया, श्रमसफल्य, अक्षता केणे चाळी, नंदकुंज अपार्टमेंट, रिजन्सी पॅराडाईज, लक्ष्मीपार्क अपार्टमेंट, त्रिमुर्ती कॉलनी, अजमेरा हाईटस, न्यू ईरा, रोझमेरी, शिव अमृतधाम, योगीधाम, धाकटेश्वर महादेव मंदिर, बंदरपाडा या प्रमुख भागांचा समावेश होतो.

KDMC Election 2022, Ward (4) : प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी शिवसेनेचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 10:26 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा निवडणूक (KDMC Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. आरक्षणाची घोषणा देखील करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे 52 जागा जिंकत शिवसेना (Shiv sena) कल्याण डोंबिवली महापालिकेत नंबर एकचा पक्ष ठरला होता. तर भाजपाने (BJP) 42 जागांवर विजय मिळवत दुसरे स्थान प्राप्त केले होते. मनसेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा प्रभागाची रचना बदलण्यात आल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. वार्ड क्रमांक चार बाबत बोलायाचे झाल्यास वार्ड क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी शिवसेनेने बाजी मारली होती. 2015 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रजनी मिरकुटे या विजयी झाल्या हेत्या. मात्र यंदा शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झालीये.

प्रभाग क्रमांक 4 मधील महत्त्वाचे भाग

गौरीपाडा तलाव, मातृछाया, श्रमसफल्य, अक्षता केणे चाळी, नंदकुंज अपार्टमेंट, रिजन्सी पॅराडाईज, लक्ष्मीपार्क अपार्टमेंट, त्रिमुर्ती कॉलनी, अजमेरा हाईटस, न्यू ईरा, रोझमेरी, शिव अमृतधाम, योगीधाम, धाकटेश्वर महादेव मंदिर, बंदरपाडा या प्रमुख भागांचा समावेश हा प्रभाग क्रमांक चारमध्ये होतो.

प्रभाग क्रमांक चारमध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक चारची एकूण लोकसंख्या ही 31378 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 4014 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1451 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

2015 मधील चित्र काय?

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक चारमधून शिवसेनेने बाजी मारली होती. या प्रभागामधून शिवसेनेच्या उमेदवार रजनी मिरकुटे या विजयी झाल्या हेत्या. मात्र यंदा एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी एक मोठा आव्हान बनली आहे. अशा स्थितीमध्ये प्रभाग क्रमांक चारमधून कोण विजयी होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या सोडतीनुसार कल्याण, डोबिंवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार अ मध्ये अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक चार ब मध्ये सर्वसाधारण महिला तर क हा वार्ड अनारक्षित आहे.

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 ब

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 क

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

2015 च्या निवडणूक आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वेळी शिवसेना हा या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसून येते. 2015 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर होती, भाजप दुसऱ्या तर मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र यंदाची ही निवडणूक सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरील आव्हाने वाढवणारी आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपाची युती झाल्यास भाजपाची सत्ता येऊ शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.