‘ब्राह्मणांचा तुला मत्सर! कोण रे तू?’ अभिनेत्री केतकी चितळे हीची वादग्रस्त पोस्ट! केतकीविरोधात गुन्हा

'ब्राह्मणांचा तुला मत्सर! कोण रे तू?' अभिनेत्री केतकी चितळे हीची वादग्रस्त पोस्ट! केतकीविरोधात गुन्हा
वादग्रस्तपोस्टमुळे गुन्हा
Image Credit source: TV9 Marathi

Ketaki Chitale News : आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात (Kalva Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरा ढाकणे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 10:02 PM

ठाणे : आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale Post) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला ट्रोलही केलं जात होतं. फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. याआधीही वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात (Kalva Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतकी चितळे यांनी फेसबुकवरुन शेअर केली आहे. हजारो लोकांनी या पोस्टवर कमेंट केल्यात. कवितेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे.

नेमकी ती पोस्ट काय?

अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की..

तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड || -Advocate Nitin Bhave

भाजपकडूनही पवारांवर टीका

साताऱ्यामध्ये परवा शरद पवारांनी जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल` या संग्रहातील `पाथरवट` ही कविता लोकांसमोर आणली होती. त्यानंतर त्यावर अनेक चर्चा केल्या गेल्या. ती कविता सादर केल्यानंतर भाजपने ट्विट करत त्या कवितेचा संदर्भ त्यांनी धर्माशी जोडून शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तर आज अभिनेत्री केतकी चितळेने ‘तुका म्हणे पवारा…’ ही कविता फेसबुकला शेअर करत शरद पवारांवर निशाणा साधलाय.

हे सुद्धा वाचा

याआधी केतकी चर्चेत..

याआधीही केतकी चितळेने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होतं. त्यामुळे तिच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानका गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें