Ajit Pawar on Ketaki Chitale : ‘त्यांना चांगल्या दवाखान्यात नेण्याची गरज’, केतकी चितळेच्या पोस्टनंतर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया

Ajit Pawar on Ketaki Chitale : 'त्यांना चांगल्या दवाखान्यात नेण्याची गरज', केतकी चितळेच्या पोस्टनंतर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया
अजित पवार यांची केतकी चितळेवर खोचक टीका
Image Credit source: TV9

अजित पवार यांनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. 'त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे', असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावलाय.

भूषण पाटील

| Edited By: सागर जोशी

May 14, 2022 | 6:24 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळेने आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली आहे. केतकीच्या पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केतकीवर कारवाई होणारच असं स्पष्ट केलं आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. ‘त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे’, असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावलाय.

अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्ष असेल किंवा कुणीही अशा पद्धतीनं वक्तव्य करु नये. मी अशा वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अशा प्रकारचं वक्तव्य करणारे मनोरुग्णच म्हणावे लागतील. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी केतकीच्या पोस्टबाबत तिखट प्रतिक्रिया दिलीय.

कोण केतकी चितळे माहिती नाही – पवार

केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याबाबत खुद्द पवारांनाच विचारलं असता कोण केतकी चितळे माहिती नाही. तिने माझ्याबाबत काय लिहिलं माहिती नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी केतकी चितळेवर अधिक बोलणं टाळलं.

केतकी चितळेची पवारांबाबतची आक्षेपार्ह पोस्ट काय?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेविरोधात पुणे, कळवा, गोरेगाव, बीड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. अशावेळी ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे. केतकीवर कारवाई होणारच असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें