तातडीने चौकशी करुन अॅक्शन घ्या, किरीट सोमय्यांची धनंजय मुंडेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

धनंजय मुंडेंनी महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:34 PM, 13 Jan 2021

मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांवर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. मी महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय. (Kirit Somaiya Complaint Against Dhananjay Munde Directly To The Election Commission)

धनंजय मुंडेंनी सार्वजनिकरीत्या दोनदा लग्न झाल्याचं कबूल केलंय. दोन्ही बायका आणि मुलांचीही त्यांनी जबाबदारी घेतलीय. दुसऱ्या पत्नीची बहीण रेणू शर्मानं काल मुंबई पोलिसांकडे धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिली. तसेच दोन्ही बायकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचं धनंजय मुंडेंनीही कबूल केलंय. तसेच रेणू शर्मा आणि त्यांचे जवळचे संबंध असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. परंतु ऑक्टोबर 2019मध्ये निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन बायका आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केलीय.

12 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (NCP Minister Dhananjay Munde) यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करून आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं होतं. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंधात होतो, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये खुलासा केला होता.

त्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवलाहोता. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThackeray) आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल 

Kirit Somaiya Complaint Against Dhananjay Munde Directly To The Election Commission