सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात हे गंभीर आरोप झाल्यानं विरोधकांनीही मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात (Dhananjay Munde) एका महिलेनं बलात्काराची तक्रार दिली. पण पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली नसल्याचं तिने ट्विटमध्ये म्हटलं. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडेंनीही फेसबुक पोस्ट करत खुलासा केलाय. सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात हे गंभीर आरोप झाल्यानं विरोधकांनीही मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. (kirit Somaiya Criticizes On Thackeray Government Dhananjay Munde Affair)
विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनीसुद्धा या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ”मुख्यमंत्र्यांवर बंगलो लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.
चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही : नवाब मलिक
तर दुसरीकडे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. ”एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करतेय ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे. रेणू शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील. चौकशीत सगळं समोर येईल. आणि त्याची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. एखाद्या महिलेसोबत त्यांचं लग्न आधी झालेलं आहे, त्यांची मुलं आहेत. सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकत होत्या. कोर्टाकडून काही तरी आदेश आणला. आता त्यांच्या बहिणी समोर येत आहेत. चौकशीनंतरच काय ते समोर येईल, त्यावर फार काही बोलू शकणार नाही”, असं नवाब मलिक म्हणालेत.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.
त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.”
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?
kirit Somaiya Criticizes On Thackeray Government Dhananjay Munde Affair