KMC Election 2022, Ward 16 : प्रभाग क्रमांक 16मध्ये आवाज कुणाचा?; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू!

KMC Election 2022, Ward 16 : कोल्हापूरकरांनी नेहमीच धक्कादायक निकाल दिला आहे. कधी स्थानिक आघाड्यांना साथ दिलीय तर कधी प्रस्थापित राजकीय पक्षांना साथ दिली आहे. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे.

KMC Election 2022, Ward 16 : प्रभाग क्रमांक 16मध्ये आवाज कुणाचा?; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू!
प्रभाग क्रमांक 16मध्ये आवाज कुणाचा?; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:07 AM

कोल्हापूर: येत्या दिवाळीपर्यंत राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यात कोल्हापूर महापालिकेचाही (KMC Election 2022) समावेश आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात बडे राजकीय पक्षांसह (political party) छोट्या पक्षांचाही समावेश आहे. तर आजी-माजी नगरसेवकांनीही आपल्यालाच तिकीट मिळावं म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या नाही तर आपल्या पत्नीला तरी तिकीट मिळावं म्हणून या आजीमाजी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. तर आरक्षण (reservation) आणि मतदारसंघाच्या फेरबदलामुळे अख्ख्या मतदारसंघाचंच चित्रं बदलल्याने अनेक इच्छुकांनीही आपल्याला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कुणावर मेहरबान होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर, कोल्हापूरकर कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आरक्षणाचे घट बसले

प्रभाग क्रमांक 16मधील वॉर्ड अ हा ओबीसींसाठी राखीव झाला आहे. तर ब वॉर्ड हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर वॉर्ड क हा सर्वांसाठी खुला आहे. आरक्षणाचे घट बसल्यानंतर आता इच्छुक आणि आजी माजी नगरसेवकांची तिकीट मिळवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कुणी स्वत:साठी प्रयत्न करत आहे, तर कुणी पत्नी, मुलगी, सूनेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण तिकीट कुणाच्या पदरात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 16, अ

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

मतदारांच्या हाती सबकुछ

प्रभाग क्रमांक 16मध्ये 16 हजार 963 मतदार आहेत. यात अनुसूचित जातीचे 1 हजार 330 तर अनुसूचित जमातीचे 91 मतदार आहेत. यात पुरुष आणि महिलांची संख्या जवळपास प्रत्येकी सात हजाराच्यावर आहे.

हे विभाग ठरवणार आपले नगरसेवक

प्रभाग क्रमांक 16मध्ये महत्त्वाचे विभाग येतात. या प्रभागात काटकर पार्क, राजर्षि शाहू जलतरण तलाव परिसर, राजाराम रायफल्स, सायबर चौक, दौलत नगर, छत्रपती शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, आयएएस ट्रेनिंग सेंटर, दौलतनगर झोपडपट्टी, शिवाजी हौसिंग सोसायटी, कोरगावकर हौसिंग सोसायटी, स्वामीमळा, माळी कॉलनी, कोल्हापूर मनपा बॅडमिंटन हॉल, मिलिट्री एरिआ, कुलगुरु निवास, राजाराम तलाव आणि केएसबीपी गार्डन आदी विभाग या येतात.

प्रभाग क्रमांक 16, ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

कोल्हापूरकरांच्या मनात काय?

कोल्हापूरकरांनी नेहमीच धक्कादायक निकाल दिला आहे. कधी स्थानिक आघाड्यांना साथ दिलीय तर कधी प्रस्थापित राजकीय पक्षांना साथ दिली आहे. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे कोल्हापूरकर कुणाला साथ देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूरकर महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाला साथ देतील त्यावरून राज्याचं विधानसभेचं गणित काय असेल हे सुद्धा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच कोल्हापूरची निवडणूक ही नुसतीच चुरशीची ठरणार नाही तर राज्याचं राजकीय चित्रंही स्पष्ट करणारी ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 16, क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर
Non Stop LIVE Update
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?.
प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात
प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात.
फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांच्या अटकेचा डाव, शिंदेंचा गौप्यस्फोट
फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांच्या अटकेचा डाव, शिंदेंचा गौप्यस्फोट.