वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar obc reservation)

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 7:49 AM, 26 Nov 2020
Vijay Wadettiwar

नागपूरः सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळप्रसंगी ओबीसींचीही शक्ती दाखवू. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिला आहे. नागपुरात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Let’s Show The Power Of OBCs In Time Says Vijay Wadettiwar)

ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे, असा इशारा देत ओबीसींच्या मुद्द्यावर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक झाले आहेत.

ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, ओबीसींच्या मागण्यांवर वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठ्यांवरही आगपाखड केली होती. मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला होता. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला होता. Let’s Show The Power Of OBCs In Time Says Vijay Wadettiwar

ओबीसी गोलमेज परिषदेला उपस्थित राहिल्याने विरोधकांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यालाच विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. विजय वड्डेट्टीवार म्हणाले होते की, “एखाद्या नेत्याने मराठा समाजासाठी मेळावा घेतला तर तो ओबीसीच्या विरोधात आहे, असा अर्थ होईल का? मी ओबीसी आहे आणि ओबीसीसाठी येथे आलो आहे, तर विरोधकांच्या आरोपांचा काहीही संबंध येत नाही. निवडणुकीच्या काळात समाजाचे मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागायला जाताना लाज वाटत नाही का? त्यावेळी राज्यघटना, अधिकार, जबाबदारी नसते का? हे नेते मतांच्या ओंजळीसाठी निवडणूक आली की मग समाजा-समाजाचे मेळावे घेतात. त्यावेळी त्यांना काय म्हणून हिणवाल?”, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

हेही वाचा :

ओबीसींना संविधानाने दिलेला अधिकार मागण्याचा हक्क; संविधानाच्या पलिकडे जाणं चुकीचं : विजय वडेट्टीवार

क्रेडिट घेण्यासाठीच लोकल सुरू करण्यास टाळाटाळ; वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर आरोप

Let’s Show The Power Of OBCs In Time Says Vijay Wadettiwar