आई जगदंबे, जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यनाश होवो; गुलाबराव पाटील यांचा भरसभेत संताप

आता शिंदे यांचे आभार मानतो. ते बाहेर निघाले. दे दान सुटे गिऱ्हाण सारखे ते बाहेर निघाले आहेत, असंही ते म्हणाले.

आई जगदंबे, जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यनाश होवो; गुलाबराव पाटील यांचा भरसभेत संताप
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 6:30 PM

नंदूरबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर एक छोटेखानी सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) ही उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांनी या सभेत तुफान बॅटिंग करत ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर (maha vikas aghadi) जोरदार हल्ला चढवला. आई जगंदबा तुम्हाला आणि शिंदे साहेबांना उदंड आयुष्य देवो, बलदंड शक्ती देवो, जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो, असा संताप गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बापने नही देखी गोधडी आणि सपने मे आ गयी खाट, असं विरोधकांचं झालं आहे. सर्वसाधारण माणसात फिरणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे. याचं मूळ कारण म्हणजे सोन्याचा चमच्या घेतलेल्या माणसाच्या घरी आम्ही जन्माला आलो नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. गुलाबराव पाटील टपरी चालवायचा. असे सर्वसाधारण रिक्षावाले, टपरीवाले, बँडवाले यांचं हे पथक असलेलं सरकार आहे. सामान्य माणसाला काय लागतं हे जाणणारं हे सरकार आहे. आता शिंदे यांचे आभार मानतो. ते बाहेर निघाले. दे दान सुटे गिऱ्हाण सारखे ते बाहेर निघाले आहेत, असंही ते म्हणाले.

कोरोनाचं संकट आलं होतं. त्यावेळी आपण पोट्ट्यांना सांगायचो पंख्याला हात लावू नको. हाबू आहे. तसं हाबू करून करून आम्हाला बंद केलं. आज आदिवासी भागात एवढी जनता बघायला येत आहे. याचाच अर्थ आहे की लोकशाहीत सर्वमान्य नेत्याला ही उपस्थिती सिद्ध करत आहे, असं ते म्हणाले.

आमच्यावर आरोप केले जात आहेत. 50 खोके, एकदम ओके. पश्चिम बंगालमध्ये रेड पडली. 27 कोटी सापडले. 27 कोटी नेण्यासाठी एक ट्रक आणावा लागला. सत्तार साहब कौनसी ट्रक लायी थी आपने नोट लेने के लिए. जरा नंबर बताओ. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, असं पाटील यांनी म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.