महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार का?, अनिल परबांचा सवाल

आमचा मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार का?, अनिल परबांचा सवाल. (Anil Parab women chief minister )

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार का?, अनिल परबांचा सवाल

मुंबई: महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का?, असा थेट सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला. माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला. (Mahavikas Aghadi Chief Minister Ashish Shelar Decide?, Anil Parab Question)

ते भाजपची मराठा महिला मुख्यमंत्री म्हणत आहेत का?, भाजपचे मुख्यमंत्री की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री?, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण होणार हे आशिष शेलार ठरवणार का?, आम्ही आमचे मुख्यमंत्री केले आहेत, असा पलटवार अनिल परबांनी आशिष शेलारांवर केला. आशिष शेलार यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांना जी स्वप्ने पडली आहेत, त्यावेळी त्यांनी तो करावा. शेलार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले हे म्हणणं चुकीचे आहे. जो दगड त्यांनी भिरकावला त्याच्या अनेक ठिकऱ्या उडाल्या आहेत, अशी टीकाही अनिल परबांनी केली आहे.

तसेच अनिल परबांना राज्यपाल नियुक्त आमदारांबद्दल विचारले असता ते म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. राज्यपालांनी 15 दिवसांत निर्णय घ्यावा, ते 15 दिवस झालेले आहेत. ती विनंती आहे, कायदा नाही. विनंतीचे काय करायचे हे राज्यपालांनी ठरवायचे आहे. पण त्यांनी अजून काही केलेलं नाही. आता महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे पुढे काय करायचे याचा निर्णय घेतील. सगळ्या गोष्टी तपासून पुढचा निर्णय घ्यावा लागेल.

निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही- अनिल परब

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीला अजून सव्वा वर्ष आहे. सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना ही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. आमचं काम नेहमीच सुरू असते. निवडणूक असो वा नसो, पक्षप्रमुख नेहमीच आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेत असतात. तसाच आढावा आता सुरू आहे. निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा हा पक्ष नाही, 365 दिवस शिवसेनेचे काम सुरू असते. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही. (भाजप) प्रत्येक पक्षाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघवीत. आम्ही त्यांच्या स्वप्नामध्ये जाणार नाही, ज्या दिवशी स्वप्न भंग होईल त्यादिवशी आम्ही बोलू, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. (Mahavikas Aghadi Chief Minister Ashish Shelar Decide?, Anil Parab Question)

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

(Mahavikas Aghadi Chief Minister Ashish Shelar Decide?, Anil Parab Question)

संबंधित बातम्या:

शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी…..

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *