महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार, गृहमंत्री अनिल देशमुखांना विश्वास

सरकारने गेल्या वर्षभरात चांगले कामं केले आहे. जनता समाधानी आहे, असंही अनिल देशमुख म्हणाले. (Mahavikas Aghadi Government Will Last For More Than Five Years, Says Anil Deshmukh)

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 13:05 PM, 27 Nov 2020

नागपूरः मुख्यमंत्री म्हणाले सरकार पाच वर्षे चालणार, पण मला वाटतेय की महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार आहे, अशा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलून दाखवला. सरकारने गेल्या वर्षभरात चांगले कामं केले आहे. जनता समाधानी आहे, असंही ते म्हणाले आहेत. नागपुरात ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Mahavikas Aghadi Government Will Last For More Than Five Years, Says Anil Deshmukh)

केंद्र सरकार ED सारख्या मोठ्या संस्थेचा गैरवापर करत आहेत. पण हे चुकीचं आहे. यामुळेच आम्ही राज्यात सीबीआयला परवानगीशिवाय प्रवेशबंदी केली. नंतर अनेक राज्यात हा निर्णय झाला, असंसुद्धा अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

नागपुरात गुंडांनी भूखंड बळकावण्याचे अनेक प्रकार घडलेय. तक्रारीनंतर आम्ही नागपुरात मोठी कारवाई केली. आता राज्यभरात भूखंड बळकावणाऱ्यांवर अशाच प्रकारे कडक कारवाई करणार आहोत. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मी आणि पत्नीने पोलिसांच्या परिवारासोबत दिवाळी साजरी केली. पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी याचा मोठा फायदा झाला, असा भावनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत. Mahavikas Aghadi Government Will Last For More Than Five Years, Says Anil Deshmukh)

तर गेल्या काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवेंनी ठाकरे सरकार लवकरच पडेल, असं विधान केलं होतं. येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली होती. “कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्षाचं नाही करायचं. पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे,” असं सांगत कार्यकर्त्यांना बूथनिहाय पुन्हा कामं जोमाने करण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.

(Mahavikas Aghadi Government Will Last For More Than Five Years, Says Anil Deshmukh)

संबंधित बातम्या

राज्यपालांचा फोन आलेला, अर्णव यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही : अनिल देशमुख

डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून स्वागत