उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:15 PM, 8 Jan 2021
उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

मुंबईः सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.  महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. (Mahesh Kothe in NCP The Presence Of Sharad Pawar)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली होती. त्यानंतर महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिलीय.

महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर कोठे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रियाज मुमिन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठेंबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केलाय.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे एकत्र सत्तेत असून एकमेकांचे कार्यकर्ते फोडल्यास त्याचा वाईट संदेश जनतेत जाईल. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून असे पक्षप्रवेश रोखण्यात यावे, अशी सूचना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.त्यामुळे महेश कोठे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता होती, परंतु खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत आता कोठेंनी प्रवेश केलाय.

कोण आहेत महेश कोठे ?

महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक आहेत. कोठे  यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलाय. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडलाय. मात्र महाविकास आघाडी करून सत्तेत आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष फोडाफोडी टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षातील नेते फोडणे हे आघाडीला धोकादायक असल्याचं वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्याचीच प्रचिती पारनेर नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे समोर आला होता.

अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते. यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.

त्यानंतर महेश कोठेंसारखे सोलापुरातील बडे नेते खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर उद्धव ठाकरे यांनी महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केली.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंची पहिली कठोर कारवाई, महेश कोठेंची कायमची हकालपट्टी

शिवसेनेच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती; आता उद्धव ठाकरे काय करणार?